बाभुळसर बुद्रुक येथे मंजुर रस्त्याचे भूमिपूजन 

अल्लाउद्दीन अलवी प्रतिनिधी 

ता ४ बाभुळसर बु(ता. शिरूर) येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित दादा पवार यांच्या मार्गदर्शनाने तसेच जिल्हाध्यक्ष रवीबापू काळे यांच्या विशेष प्रयत्नातून पुणे जिल्हा नियोजन समितीतील विकास आराखड्यातून गावठाण अंगणवाडी ते बद्रीनाथ भोसले सिमेन्ट काँकीट रस्त्यासाठी १० लक्ष रुपये निधी मंजूर झालेल्या रस्त्याचे ज्येष्ठ व्यक्तीमत्व रामराव आनंदराव नागवडे यांच्या शुभहस्ते तसेच आदर्श सरपंच दिपाली नागवडे यांच्या उपस्थितीत भूमीपूजन करण्यात आले

यावेळी विद्यमान उपसरपंच मोहीनी रणदिवे, ग्रा. सदस्या मनिषा नागवडे, शंकुतला देशवंत, भीमराव नागवडे, मारुती नागवडे, रामराव पाटील नागवडे, विठ्ठल नागवडे ,अरुण रणदिवे, महेंद्र नागवडे,प्रशांत नागवडे,अमित नागवडे, सोमनाथ नागवडे, अल्लाउद्दीन अलवी, अमोल नागवडे, युनूस सय्यद, लहू शिंदे, संजय कांबळे कोयणी भोसले, श्रीराम भोसले, सागर शिंदे यांच्यासह आदी ग्रामस्थ उपस्थित होते .

जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून गावठाण मधील काँक्रिटीकरणाची कामे भक्कम व्हावी अशी अपेक्षा रामराव नागवडे यांनी बोलताना व्यक्त केली तसेच रविबापू काळे, दादा पाटील फराटे यांनी पुणे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मिळवून दिलेल्या ८० लक्ष रुपये निधीमुळे गावठाण अंतर्गत सर्वच रस्ते काँक्रिटचे होतील यामुळे गावच्या वैभवात व विकासासाठी मोठी मदत होणार असल्याचे सरपंच दिपाली नागवडे यांनी यावेळी बोलताना सांगितले. भूमीपूजन कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचे अमित नागवडे यांनी आभार मानले.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें