अल्लाउद्दीन अलवी( प्रतिनिधी)
ता २ मोशी पुणे येथे वधू वर मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी कुंभार समाज सामाजिक संस्थेच्या प्रदेश सरचिटणीसपदी शबाळासाहेब निवृत्ती वाडेकर कुंभार (रांजणगाव गणपती) शिरूर,पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी प्रविण सदाशिव कुंभार (मांडवगण फराटा) शिरूर, शिरूर तालुका अध्यक्षपदी रंगनाथ बापुराव कुंभार (पिंपळसुटी शिरूर) यांची वधु वर परिचय मेळावा आयोजित कार्यक्रमात मोशी पुणे याठिकाणी त्यांना नियुक्ती पत्रसतिश दरेकर प्रदेश अध्यक्ष यांच्या हस्ते देण्यात आले देण्यात आले
यावेळी प्रदेश अध्यक्ष मा सतिश दादा दरेकर, पुणे जिल्हा अध्यक्ष मा. ज्ञानेश्वर सोमवंशी व पुणे जिल्ह्यातील बहुसंख्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपाध्यक्ष प्रवीण कुंभार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की यापुढील काळात कुंभार समाजाच्या आर्थिक व सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले जाईल, तसेच समाजातील विविध प्रश्नांविषयी शासन दरबारी समाजाला न्याय देण्याचे काम केले जाईल असे यावेळी सांगितले.