वानवडी येथे शिक्षकदिनी शिक्षक मिळण्यासाठी विद्यार्थी व मनसेचे रोहन गायकवाड तसेच दिनेश सामल आंदोलन करताना(छाया:संदिप डोके हडपसर)
हडपसर दि.६ प्रतिनिधी संदीप डोके
शिक्षकदिन सागळ्या शाळेमध्ये साजरा मोठ्या उत्सहाने होत आहे मात्र आम्हाला शिक्षकच नाही तर पुजा कोणाची करायची आणि आशिर्वाद कोणाकडे मागायचे ?असा संतप्त सवाल वानवडी येथील मनपा शाळेतील विद्यार्थ्यांनी उपस्थित करुन आम्हाला शिक्षक देता का देता ?असे पाटीवर लिहुन शिक्षक दिनी अनोखे आंदोलन केले
वानवडी येथील एसआरपीएफबल गट क्रमांक २ येथे महानगर पालिकेची पहिली ते सातवी पर्यतची शाळा क्रमांक ८८ बी आहे आझादनगर,कृ्ष्णानगर,लक्ष्मीनगर,गणेशनगर परीसरातील१३५ विद्यार्थी या शाळेमध्ये शिक्षण घेत आहे या सर्व विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी फक्त दोनच शिक्षक आहेत गेल्या चार महिन्यानपासुन एकुण चार खोल्यांमध्ये एका वर्गात दोन , तिन वर्ग भरविले जातात दोनच शिक्षीका त्यांना शिकवत आहेत गुरु आणी शिष्य यांच्या पवित्र नात्याची आठवण म्हणजे शिक्षकदिन आणि याच दिवशी विद्यार्थ्यावर आंदोलन करण्याची वेळ आली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते रोहन गायकवाड व दिनेश सामल तसेच विद्यार्थ्यांनी शिक्षक मिळण्यासाठी हे आंदोलन केले विद्यार्थ्यांनी आपल्या पाटीवर शिक्षक देता का शिक्षक असे लिहुन प्रशासनाचा निषेध केला.
सदरील शाळा ही बंद करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न सुरु असुन या शाळेचे अन्य शाळेत विलीणीकरन होऊ नये यासाठी गेल्या ४ महिन्यांनपासुन मनसेच्यावतिने आंदोलन करण्यात येत आहे विद्यार्थांचे शालेय भविष्य धोक्यात येऊ नये यासाठी प्रयत्न सुरु असुन या शाळेमध्ये तातडीने शिक्षक नेमावे अशी मागणी मनसेचे रोहन गायकवाड व दिनेश सामल यांनी केली आहे .