विश्व मानवाधिकार संस्थेच्या वतीने अशोक बालगुडे यांना पीएच.डी.प्रदान….

पुणे, जम्मू-काश्मीर येथील ग्लोबल हुमन राईट्स ट्रस्ट (विश्व मानवधिकार संस्था)च्या वतीने दैनिकाचे उपसंपादक अशोक बालगुडे यांना मानद डॉक्टरेट (पीएच.डी.) पदवी चेअरमन डॉ.एच.आर.रेहमान व सेक्रेटरी परमजीत सिंग यांच्या वतीने बहाल करून सन्मानित करण्यात आले.

अखिल भारतीय छावा संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते डॉ. गणेश राऊत आणि संपादक श्रीकांत साबळे यांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन बालगुडे यांना गौरविण्यात आले.यावेळी दैनिकाचे उपसंपादक सागर जाधव आणि सर्व सहकारी उपस्थित होते.यावेळी डॉ.गणेश राऊत यांनी बालगुडे यांना पुढील कार्याला शुभेच्छा दिल्या.बालगुडे यांनी बांधकाम क्षेत्राला प्रसिद्धी माध्यमाचं योगदान याविषयावर ३५० पानांचा प्रबंध सादर केला आहे. तसेच,मागिल ४० वर्षांहून अधिक काळ सामान्यांसाठी निस्वार्थीपणे सेवा करीत आहेत.समाजातील अडलेल्या नडलेल्यांना मदत करणे हा त्यांचा स्वभाव आहे. त्यांची समाजसेवा ही त्यांच्या कार्याला प्रेरणा देणारी ठरत आहे, असे डॉ. गणेश राऊत यांनी सांगितले.

बालगुडे यांनी १९८२ साली बारावीनंतर मुंबईमध्ये नोकरीला प्रारंभ केला.

नोकरी करीत असताना २००२ साली टिळक विद्यापीठातून सर्टिफिकेट जर्नालिझम केले, त्यामध्ये गोवा आणि महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांक पटकाविला.पुढे सोशल सायन्स बीए पदवी मिळविली. बी.जे.., एम.जे.शिक्षण घेतले.अनेक दैनिक वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत असताना अनेक विषयांना वाचा फोडून न्याय मिळविण्यासाठी प्रयत्न केला आहे. २०२१ नामांकित दैनिकात आणि २०२४ मध्ये पुन्हा एका दैनिकात (पुणे) आवृत्तीमध्ये उपसंपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे प्रेस रिपोर्टर्स अँड जर्नालिझम हडपसर येथे बातमीदार, संपादन याविषयावर अध्यापन करीत आहेत.

आजपर्यंत पत्रकारिता क्षेत्रामध्ये त्यांनी अनेक विद्यार्थी घडविले आहेत. बांधकाम क्षेत्राला प्रसिद्धी माध्यमाचे योगदान याविषयावर ग्लोबल इंडिया ट्रस्टला ३५० पानांचा प्रबंध सादर केला, त्याविषयात संस्थेने त्यांना विद्या वाचस्पती पदवी (पीएच.डी.) प्रदान करून सन्मानित केले.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें