संतुलन भवन येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू होऊन दोन महिने झाले तरी ही अनेक महिलांना कागदपत्र व इतर अपरिहार्य कारणामुळे योजनेचा लाभ घेता आला नाही अशा महिलांसाठी पुणे महानगरपालिकेच्या वतीने, संतुलन संस्थेच्या माध्यमातून व सनी वाडेकर मित्र परिवाराच्या सहकार्याने दोन दिवसाच्या शिबीराचे आयोजन दिनांक ३० व ३१रोजी केले असून ऑन लाईन अर्ज भरण्याची संधी सर्व महिलांनी उपलब्ध करून दिली आहे.

संतुलन संस्था कार्यकरत असताना प्रामुख्याने शासनाकडे प्रचलित असलेल्या योजनांचा वंचितांना लाभ मिळवून देणे व सामाजिक सुरक्षांतर्गत नवीन योजनेसाठी धोरणात्मक जनचळवळ उभारणे असे कार्य अनेक वर्षा पासून मोठ्या जोमाने करत आहे. धरणे, आंदोलन, मोर्चा, उपोषणे व प्रासंगिक न्यायालयातही दाद मागण्याचे कार्य संस्था करत असून जास्तित जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन संतुलन संस्थेच्या संस्थापिका संचालिका ॲड.पल्लवी रेगे यांनी केले.महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून ग्रामीन, शहरी, दगडखाण, अदिवासी व फुटपाथवर राहणारे महिला लाभ घेत आहेत.

कार्यक्रम प्रसंगी ॲड. बी.एम. रेगे यांनी मनपा पुणे यांनी मोफत सुविधा उपलब्ध करून दिल्याबददल मनपाचे कौतुक केले तसेच धडाडीचे कार्यकर्ते सनी वाडेकर व वाडेकर मित्र परिवाराचे आभार मांडले. कार्यक्रमाचे संयोजन संतुलनसंस्थेचे कार्यकर्ते अदिनाथ चांदणे, सावन पाल, सिमा साळवे, स्वप्ना जांभळे व दिपक जॉन यांनी केले.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें