नामदेव शिंपी समाज युवक संघाचे अध्यक्ष व राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष श्री सिद्धेश हिरवे यांनी राहू येथे दौंडचे विकास पुरुष आमदार माननीय राहुल दादा कुल यांची भेट घेऊन समाजाविषयी अनेक प्रश्न मांडले संत नामदेव महाराज यांचे २०२५ हे ६७५ वे समाधी वर्ष असल्याने संत नामदेव महाराजांचे जयंती किंवा समाधी सोहळा शासन स्तरावरती विविध कार्यक्रमाने साजरा करण्यासाठी आपण विधानसभा सदस्य या नात्याने प्रयत्न करावेत अशी विनंती केली यानुसार माननीय आमदार राहुल कुल यांनी यासंदर्भात माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्याकडे या संदर्भात पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले व तसे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना शिफारस विनंती साठी पत्रक काढले आहे.
|
नामदेव महाराज यांचे कार्यक्रम शासन स्तरावर साजरे होण्यासाठी प्रयत्न..

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)