केसनंदच्या एक सात ग्रुप कडून जोगेश्वरी विद्यालयास खुर्च्या भेट

एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ .. या संकल्पनेतून केसनंद तालुका हवेली येथील सामाजिक कार्यासाठी नेहमीच चर्चेत असलेल्या एक सात ग्रुप कडून श्री जोगेश्वरी विद्यालय केसनंद यांना २५ खुर्च्यांचे वाटप करून एक अनोखी भेट देण्यात आली आहे.

आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून सामाजिक शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रामध्ये एक सात ग्रुप केसनंद यांचे कायम योगदान असते, जोगेश्वरी विद्यालय केसनंद यांना काही खुर्च्यांची गरज असल्याने एक सात ग्रुपने ही गरज ओळखून ग्रुपचे सदस्य पत्रकार ज्ञानेश्वर पाटेकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत विद्यालयास अनोखी भेट देऊन शाळेच्या ऋणातून काही अंशी उत्तराई होण्याचा सुंदर प्रयत्न केला आहे, व मित्रालाही वाढदिवसाची अनोखी भेट दिली आहे ,जोगेश्वरी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका निंबाळकर मॅडम यासह विद्यालयातील सर्व शिक्षक वृंद व एक सात ग्रुपचे अध्यक्ष उपाध्यक्ष खजिनदार यासह ग्रुपचे सर्व सदस्य याप्रसंगी उपस्थित होते

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें