विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी सुधीर भोसले बिनविरोध 

अल्लाउद्दीन अलवी मांडवगण फराटा :

ता.३० गणेगाव दुमाला ता. शिरूर जि पुणे येथील गणेगाव दुमाला विविध कार्यकारी सहकारी संस्था संचालक मंडळाची चेअरमन पदासाठी निवडणूक संपन्न झाली. मा.चेअरमन निलेश कोंडे यांनी इतरांना संधी मिळावी म्हणून आपल्या पदाचा राजीनामा दिला. तसेच संचालक मंडळाच्या विशेष सर्वसाधारण सभेत चेअरमन पदासाठी एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी ए एच धायगुडेसाहेब यांनी अर्जाची छाननी करून नियोजित वेळेनुसार चेअरमन पदासाठी सुधीर भोसले यांची बहुमताने निवड झाल्याचे घोषित केले. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ए. एच. धायगुडे ,सचिव सोमनाथ चोथे यांनी काम पाहिल

गणेगाव दुमाला या छोट्या गावात शेतकरी एकत्र येऊन १९६४ साली सहकारी तत्वावर या संस्थेची स्थापना केली.तसेच अतिशय कमी भागभांडवलावर सुरू केलेली संस्था शेतकऱ्यांच्या सहकार्याने आज ११३४ सभासद संख्या असून १ कोटी १६ लाख रुपये भागभांडवल संस्थेकडे आहे. मूळ उद्देश शेतकऱ्यांना शेतीसाठी आर्थिक साहाय्य त्वरित उपलब्ध व्हावे. त्याच बरोबर शेतीसाठी लागणारी खते व भाडेतत्त्वावर शेती औजारे संस्था पुरविते.

नवनिर्वाचित चेअरमन सुधीर भोसले यांचा सभासद व ग्रामस्थांनी सन्मान केला. सन्मानाला उत्तर देताना सुधीर भोसले यांनी सांगितले की सर्व सभासदांना संस्थेच्या माध्यमातून शेतीसाठी आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल .मला दिलेल्या संधीचा सर्वांसाठीच उपयोग करील.

यावेळी विद्यमान संचालक /मा चेअरमन निलेश कोंडे,मानसिंग शितोळे,प्रमोद गरुड, दत्तात्रय निंबाळकर, नवनाथ नांदखिले,ज्ञानदेव गरुड,बाळासाहेब इंगळे सभासद ग्रामस्थ बन्सीलाल जगताप,ईश्वर भोसले, भालेराव भोसले, नामदेव निंबाळकर, कुंडलिक भोसले, हनुमंत भोसले, सुधीर निंबाळकर, अमोल भोसले, गोपाळ जगताप,जालिंदर बंड, शिवाजी भोसले, रामदास भोसले, कैलास भोसले, पंडित बोरावडे,गोरख भोसले, दिलीप ढमढेरे,सुरेश भोसले, धोंडिबा भोसले उपस्थित होते.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

01:08