भारतीय जनता पार्टीच्या वतीने वाघोलीत भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन

 

वाघोली  ता. हवेली : बाजारतळ मैदान येथे दि.०९/०९/२०२३ रोजी सां ६.०० वा भव्य दहीहंडी उत्सव भारतीय जनता युवा मोर्चा पुणे जिल्हा यांच्या वतीने मा.शरद बुट्टे पाटील भाजपा पुणे जिल्हा अध्यक्ष ,मा. प्रदीप कंद शिरूर-हवेली विधानसभा निवडणूक प्रमुख, पिडीसीसी बँकेचे विद्यमान संचालक, मा. संदीप भोंडवे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश क्रीडा आघाडी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजक गणेश कुटे उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा, संदीप सातव मा.उपसरपंच वाघोली/ संघटन सरचिटणीस पुणे जिल्हा युवा मोर्चा,अविनाश कुटे  विद्यमान ग्रा. सदस्य आव्हाळवाडी.यांनी आयोजित केला आहे.

या दहीहंडीच्या भव्य दिव्य उत्सवासाठी चंद्रशेखर बावनकुळे साहेब अध्यक्ष भाजपा महाराष्ट्र राज्य, व  चंद्रकांतदादा पाटील पालकमंत्री पुणे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच प्रमुख पाहुणे बाळा भेगडे माजी राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य, महेश लांडगे आमदार भोसरी विधानसभा, राहुल कुल आमदार दौंड विधानसभा, माधुरी मिसाळ आमदार पर्वती विधानसभा, मुरलीधर मोहोळ माजी महापौर पुणे / सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश भाजपा, विक्रांत पाटील सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश भाजपा, राहुल लोणीकर अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा, राजेश पांडे उपाध्यक्ष भाजपा महाराष्ट्र प्रदेश,धीरज घाटे अध्यक्ष पुणे शहर भाजपा, जगदीश मुळीक माजी आमदार वडगावशेरी विधानसभा, बापूसाहेब पठारे माजी आमदार वडगाव शेरी विधानसभा, योगेश टिळेकर माजी आमदार हडपसर विधानसभा,अनुप मोरे सरचिटणीस भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र ,विजय हरगुडे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश कामगार आघाडी,बाबाराजे जाधवराव निवडणूक प्रमुख पुरंदर विधानसभा, किरण दगडे पा. निवडणूक प्रमुख भोर हे प्रमुख मान्यवर तसेच भाजपचे इतर नेते, पदाधिकारी, आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमासाठी प्रमुख आकर्षण सिने अभिनेत्री अमिषा पटेल, नृत्यांगना गौतमी पाटील, प्रसिद्ध साऊंड सिस्टिम, लेझर लाईट, ढोल ताशा पथक यांच्यासह सीने कलाकार या उत्सवाचे प्रमुख आकर्षण असणार आहे .

या वर्षी वाघोलीतील दहीहंडी मोठ्या जल्लोषात साजरी करण्याच आयोजकांनी ठरवलंय तरि या परिसरातील नागरिकांनी आवर्जून उपस्थित रहावे. तसेच कुठल्याही प्रकारचा संभ्रम मनात न ठेवता मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने दहीहंडी उत्सव साजरा करा हे करताना पोलीस व प्रशासनाला सहकार्य करावे असेही आवाहन आयोजक गणेश कुटे, संदीप सातव, अविनाश कुटे यांनी केले आहे.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें