हडपसर प्रतिनिधी संदीप डोके
नारोडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची वार्षिक सभा सोसायटीचे चेअरमन विठ्ठलराव पिंगळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
सन २०२२ ते २०२३ .ह्या आर्थिक वर्षामध्ये सोसायटी ला रुपये ५२४४३२. लाख नफा झाला असून १०% लाभांश सभासदांना जाहीर केला.
सदर प्रसंगी सोसायटीचे सचिव श्री संजय घोडेकर यांनी अहवाल वाचन केले. महाराष्ट्र राज्य सहकारी बोर्डाचे हिरामण ढोरे यांनी अतिशय मौलिक मार्गदर्शन सभासदांना केले. सभेमध्ये अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली.
सदर मीटिंगला विद्यमान संचालक मंडळ, गावातील ग्रामस्थ, सभासद ,ज्येष्ठ नागरिकसंघाचे सर्व सभासद उपस्थित होते. व शेवटी अध्यक्षीय मनोगतानंतर सर्व उपस्थितांचे आभार बबनदादा पिंगळे यांनी मानले व सभा संपल्याचे जाहीर केले.