पुणे : (वार्ताहर)
राज्यात व जिल्हातील शेतकऱ्यांना मोबाईल अपच्या सहाय्याने स्वतःच्या मोबाईलवरून ई-पीक पाहणी तलाठ्याकडे न जाता स्वतःच्या शेतात जाऊन आपल्या ७/१२ वर विविध पिकांची नोंदणी करण्याचे आवाहन उपजिल्हाधिकारी श्रीरंग तांबे यांनी केले आहे.
महसूल विभागाचा ई-पीक पाहणी प्रकल्प १५ ऑगस्ट २०२१ पासून महाराष्ट्रात राज्यभर राबविण्यात येत आहे. या अॅपमध्ये आतापर्यंत सुमारे १.८८ कोटीपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी रेजिस्ट्रेशन केलेले आहे व आपल्या पिकांची नोंदणी केली आहे.खरीप हंगाम २०२३ पीक पाहणी नोंदणीसाठी ई-पीक पाहणीचे २.०.११ हे अपडेटेड व्हर्जन गूगल प्ले स्टोअर वर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.तरी सर्व खातेदार शेतकऱ्यांनी नवीन व्हर्जन अपडेट करून घेणे आवश्यक आहे. खरीप हंगामाच्या प्रत्यक्ष ई-पीक पाहणी मोबाईल अॅपद्वारे पीक पाहणी करण्यासाठी ०१ जुलै २०२३ पासून सुरु करण्यात येत आहे.
तरी राज्यातील सर्व शेतकरी बंधु-भगिनींना अवाहन करण्यात येते कि त्यांनी खरीप हंगामा २०२३ साठी दिलेल्या कालावधीमध्ये आपली ई-पीक पाहणी नोंदणी पूर्ण करावी जेणे करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेता येणार असल्याचे उपजिल्हाधिकारी श्रीरंग तांबे यांनी शेतकऱ्यांना परिपत्रक काढून अहवानाद्वारे केले.