हडपसर दि.४(प्रतिनिधी संदिप डोके)
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून बाजार पेठा सजल्या आहेत मुर्तीकरांची गणपतीच्या मूर्तींना रंगकाम व नक्षिकाम करण्यासाठी कारागिरांची लगबग सूरु झाली आहे
गणपती बाप्पाचे आगमन होणार म्हटले कि बाळगोपाळा पासुन तर अगदी वयोवृद्धापर्यत सर्वांमध्ये आनंदाचे वातावरण पाहिला मिळते कोंढवा खुर्द येथील गणेश मूर्तिकार पांडुरंग लोणकर हे गेल्या अनेक वर्षांपासून ना.नफा.ना तोटा या तत्वावर आधारित बाप्पाची मूर्ती बनविण्याचे काम करतात दगडूशेठ गणपती, लालबागचा राजा, फुलातील गणपती, बैठ्या गणपतीला जास्त प्रमाणात मागणी आहे आपण ४००० लहान मोठे गणपती बनवत असून सर्व मुर्ती ग्राहकांनी व मंडळांनी मुर्ती बुकिंग करून ठेवल्या आहेत फायनल गणपती रंगवण्याचे तसेच फेटे घालण्याचे काम सुरू आहे ३१ सप्टेंबर ला गणपती असुन जसजशी तारीख जवळ येते तसे आम्हाला रात्रभर जागून गणपतीला रंग देऊन मुर्ती सजवावी लागते
सध्याच्या महागाईच्या काळात गणपती मुर्ती बनविताना गणपती बनवायचे साहित्य खुप महाग झाले आहे भाव वाढले म्हणुन मी कधी च बाप्पाची मुर्ती बनविने सोडणार नाही बाप्पा आमची ऊर्जा आहे तसेच गणेश भक्तांसाठी स्वखर्चातून विसर्जन हौदाची व्यवस्था करत असल्याचे मुर्तीकार पांडुरंग लोणकर यांनी सांगितले सध्या बाजारात गौरी गणपती सजावटीसाठी लागणार्या वस्तुंची दुकान कोंढवा खुर्द, कोंढवा बुद्रुक, वानवडी,उंड्री..पिसोळी, भागात सज्ज होत असल्याचे चित्र दिसून येत आहे
फोटो ओळ: *गणपती मुर्तीला रंगरंगोटी व फेटे घालताना मुर्तीकार पांडुरंग लोणकर*(संदिप डोके हडपसर)