हडपसर प्रतिनिधी : संदीप डोके
कोंढवा भागात मागील काही दिवसांत मोस्ट वॉन्टेड दहशतवादी सापडले आहेत तरी आपल्या परिसरात शांततेचा भंग होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये त्याकरिता महंमदवाडी व उंड्री परिसरातील शाळा,हॉस्पीटल तसेच मॉल,सोसायटी या ठिकाणी असणारे सेक्युरिटी गार्ड यांची पोलिस व्हेरिफिकेशन व लायसनची तपासणी करण्यात यावी अशी मागणी विधानसभा मतदार संघाच्या वतिने कोंढवा पोलिस स्टेशनचे वरिष्ट पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली
भारतीय जनता पार्टीचे युवा नेते राजेंद्र भिंताडे,हडपसर विधानसभा मतदार संघांचे उपाध्यक्ष हनुमंत घुले यांनी महंमदवाडी व उंड्री ग्रामस्थानच्या वतिने सदरील निवेदन दिले त्यावेळी दादासो कड,राजेंन्द्र खरात उपस्थित होते
महंदवाडी व उंड्री भागात मोठ्या प्रमाणात परप्रांतिय नागरीक व परदेशी नागरीक मोठ्या प्रमाणात आहे सदरील लोक या भागात कोणताही ओळखीचा पुरावा नसताना महमंदवाडी व उंड्री भागात सोसायटी,शाळा,हॉस्पीटल,व मॉल मध्ये काम करत आहे मात्र बाहेरुन येणार्या नागरीकांची ओळखपत्रांची तपासणी करावी भविष्यात कोणता एखादा गैरप्रकार घडु नये याची खबरदारी म्हणुन कोंढवा पोलिस स्टेशनला निवेदन देण्यात आल्याचे युवा नेते राजेंन्द भिंताडे यांनी सांगीतले