Home ताज्या बातम्या नामदार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते हडपसर मधील ससाणेनगरमध्ये उभारलेल्या १०६ फूट उंचीचा तिरंगा ध्वज स्तंभाचा लोकार्पण सोहळा पार पडला

नामदार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते हडपसर मधील ससाणेनगरमध्ये उभारलेल्या १०६ फूट उंचीचा तिरंगा ध्वज स्तंभाचा लोकार्पण सोहळा पार पडला

0
नामदार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते हडपसर मधील ससाणेनगरमध्ये उभारलेल्या १०६ फूट उंचीचा तिरंगा ध्वज स्तंभाचा लोकार्पण सोहळा पार पडला

हडपसर ससाणेनगर येथे १०६ फुटी ध्वजस्तंभाचे उदघाटन उपमुंख्यमंत्री अजित पवार करताना समवेत संयोजक योगेश बापु ससाणे(छाया:संदिप डोके हडपसर)

 

हडपसर  (प्रतिनिधी) संदिप डोके

हडपसर मधील  ससाणेनगरमध्ये उभारलेला १०६ फूट उंचीचा तिरंगा ध्वज स्तंभाचा लोकार्पण सोहळा  नामदार अजितदादा पवार  यांच्या हस्ते पार पडला.

त्यावेळी हडपसरच्या जनतेच्या हितासाठी,नागरी प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करणाऱ्या नगरसेवक योगेशबापू ससाणे यांनी स्वखर्चातून  १०६ फूट उंचीचा तिरंगा ध्वज स्तंभ उभारून  नव्या पिढीत राष्ट्रप्रेम जागृत करण्याचे काम केले असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी ससाणेनगर येथे बोलताना केले.

व्यासपीठावर याप्रसंगी आमदार चेतन तुपे पाटील,श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे चेअरमन पांडुरंग राऊत,एग्झ्युक्युटीव्ह चेअरमन विकास रासकर,शिवसेना शहर प्रमुख प्रमोद भानगिरे,माजी महापौर राजलक्ष्मी भोसले,वैशाली बनकर , माजी उपमहापौर बंडुतात्या गायकवाड,माजी सभापती सचिन घुले,संदीप तुपे,आरपीआय नेत्या शशिकला वाघमारे,राष्ट्रवादी विधानसभा प्रमुख डॉ शंतनू जगदाळे,माजी नगरसेवक सोपान दादा गोंधळे ,गणेश ढोरे,फारूक इनामदार, अशोक कांबळे,आनंद अलकुंटे,बाबुराव चांदेरे,मारुती तुपे,सुनील बनकर,माजी नगरसेविका प्राची आल्हाट,नंदा लोणकर,विजया कापरे , विजया वाडकर ,उषाताई कळमकर, हेमलता मगर,विजया कापरे,उज्वला जंगले,रुकसाना इनामदार,काँग्रेस नेते प्रशांत सुरसे ,स्वीकृत नगरसेवक अविनाश काळे,सागरराजे भोसले,संजय शिंदे,मनोज घुले,आसिफ मणियार,अजित ससाणे,बाळासाहेब न्हावले,संजीवनी जाधव,नितीन आरु .ससाणे एजुकेशन संस्थेचे चेअरमन तुकाराम ससाणे,विजय ससाणे,गोरख ससाणे,शंकर ससाणे,शिवा शेवाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

ससाणेनगरमध्ये ढोलताशांच्या गजरात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे स्वागत करण्यात आले,छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अपर्ण केल्यानंतर नगरसेवक योगेशबापू ससाणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या स्व.डॉ समीर बोराटे पथ नामफलकाचे अजितदादांच्या हस्ते झाले यावेळी बोराटे परिवाराकडून त्यांचे स्वागत करण्यात आले त्यांनतर १०६ फूट उंच ध्वज स्तंभाचे उदघाटन झाले,राष्ट्रगीत,परेड,सलामी न्यू इंग्लिश स्कुलच्या तसेच वर्धमान इग्लिश स्कुल व माळीण बाई प्रशाळा च्या विद्यार्थ्यांनी दिली,यावेळी सर्वानी भारत माता कि जय,वंदे मातरमचा जयघोष केला.

फुले पगडी,उपरणे,राधा कृष्ण प्रतिमा,भगवतगीता देऊन अजितदादांचा उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल यावेळी योगेशबापू आणि मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.आर्यनमॅन डॉ शंतनू जगदाळे,सायकलपटू चंद्रकांत हरपले यांच्यासह मनपा अतिरिकत आयुक्त विकास ढाकणे व मनपा उपायुक्त संदीप कदम तसेच एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन पीएसआय पदी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा तसेच रनर राजेश पाटील,किरण घुले,राजु पोतदार इत्यादीचा सन्मान यावेळी अजितदादांच्या हस्ते करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना नगरसेवक योगेश ससाणे यांनी वाहतूक कोंडी,सोलापुर रोड ला पर्यायी रस्ते,ससाणे नगर रेल्वे भुयारी मार्ग,पाणी टंचाई , हडपसर भाजी मंडई चे विस्तारीकरण , बेबी कॅनाल वरुन रोड अथवा मेट्रो प्रकल्प , हडपसर विधान सभा मतदार संघांतील सुमारे ६ ठिकाण चे विविध अंडरपास , रामटेकडी कचरा प्रकल्प या गंभीर प्रश्नाकडे अजितदादांचे लक्ष वेधत विविध उपाययोजना राबवण्याची मागणी यावेळी केली.

विशेष बाब म्हनजे जवळपास सुमारे ३० माजी नगरसेवक स्विक्रुत नगरसेवक यांना बोलवुन योगेश ससाणे यांनी वरील सर्वाना कोनशिलेवर त्या सर्वांची नावे टाकुन सन्मानित करुन आगामी मोठ्या निवडणुकी साठी बेरजेचे राजकारण केल्याची चर्चा कार्यक्रम स्थळी नागरिकां मधे एैकायला मिळाली . तसेच राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील वरिष्ठ नेत्याचे फोटो लावुन दोन्ही गटांना समांतर ठेवण्याची कला साधल्याची खमंग चर्चा कार्यक्रम स्थळी दिसुन आली . तर आभार माजी नगरसेवक सुनील बनकर यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी योगेशबापू ससाणे मित्रपरिवार आणि सावली फाउंडेशनच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.