हडपसर प्रतिनिधी: संदीप डोके
येवलेवाडी ता.हवेली :येथे शिवतेज प्रतिष्ठाणच्या वतिने युवा उद्याेजक प्रशांत जाधव यांनी रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते यावेळी कार्यक्रमास संदिप दादा धांडेकर ,समीर शेलार,वाल्मीक जाधव,प्रविण कामठे,अजय काळभोर,शकिल पानसरे,कैलास ठोसर महिला भगिनी सह बहुसंख्य स्थानिक नागरीकांनी रक्तदान केले सुमारे २३२ रक्तदात्यानी रक्तदान करण्यामध्ये सहभाग नोंदविला.
सध्याच्या धावपळीच्या युगात वावरत असताना रस्त्यांमध्ये अनेक अपघात होतात मात्र आपण प्रत्यक्ष मदत करु शकत नसलो तरी रक्तदान करुन आपण एखाद्या व्यक्तीचा जिव वाचु शकतो म्हनुनच रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे रक्तदान करुन एखाद्या व्यक्तिचा जीव वाचु शकतो असे मत मुस्लीम राष्ट्रीय किर्तनकार शिवव्यख्याते हभप कबीर महाराज अत्तार यांनी व्यक्त केले.
सर्वसामान्य नागरीकांमध्ये रक्तदानाविषयी असलेले गैरसमज दुर व्हावेत व त्याचे महत्व लोकांना समजावे हा या शिबीरामागचा उद्देश होता रक्तदान हेच सर्व श्रेष्ठ दान असल्याचे युवा उद्योजक प्रशांत जाधव यांनी “शिरूर हवेली न्यूज” शी बोलताना सांगीतले.