हडपसर प्रतिनिधी: संदीप डोके
ता. हवेली (दि.४) २१ व्या शतकाकडे वाटचाल करत असताना शालेय अभ्यास क्रमाबरोबर विद्यार्थानी कला क्रिडा क्षेत्रात नाव कमवावे असे मत कसबा विधान सभा मतदार संघाचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी व्यक्त केले
हडपसर सय्यदनगर येथे आणा भाऊ साठे व कॉंग्रेस पक्षाचा वर्धापन दिनाचे औचित्य साधुन दिया फाऊंडेशन व हडपसर विधानसभा कॉंग्रेस पक्षाच्या वतिने शालेय विद्यार्थांन साठी भव्य दिव्या स्लो सायकलिंग स्पर्धेचे आयोजन केले होते त्या प्रसंगी ते बोलत दिया फाऊंडेशच्या अध्यक्षा नसिम अम्मी शेख तसेच कॉंग्रेस पक्षाचे युवा कार्यकर्ते इमान शेख यांनी लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय सय्यदनगर मोहमंदवाडी रोड पुणे या ठिकाणी स्लो सायकल स्पर्धेचा बक्षिस वितरण प्रसंगी ते बोलत होते.
या स्पर्धेत १ली ते ९ वी च्या शालेय विद्यार्थांनसाठी स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यापैकी विजेता झालेल्या विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे: (१ली) फैजान इम्रान पठान( २ री), १) आदम आबीद शेख, २) अर्शीयान अलताफ शेख, (३ री ते ४थी) १) तासीर सिराज खान, २ )अतीफ सेफन शेख, (५वी ते ७वी) १) अब्दुला सलीम दलवी, २)नोमान अतीक अनसरी, (८वी ते ९वी) १)सैफ दलवी, २) फैजान पटेल या प्रत्येक सहभागी स्पर्धकाला सन्मानपत्र तसेच बक्षीस दिले त्याप्रसंगी कार्यक्रमासआमदार रवींद्र भाऊ धंगेकर , दिया फाऊंडेशच्या अध्यक्षा नसिम अम्मी शेख ,मतिन शेख ,इम्रान शेख ,इंटक शहराध्यक्ष बळीराम दादा डोळे, पुणे शहर काँग्रेस चिटणीस रजियाताई बल्लारी,कोंढवा काँग्रेस प्रभाग अध्यक्ष नूर भाई शेख, संजय डोंगरे , निलोफर शेख, तौसिफ पटेल, युवक सरचिटणीस अक्षय बहिरट ,कृष्णा आदमाने, दस्तगीर शेख,बाबू हरणे,इमरान भाई शेख मित्रपरिवार व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व उपस्थीतांचे आभार मतिन शेख यांनी मानले