उंड्रीगाव गामपंचायतीच्या संगणकीय (पीडीएफ)बांधकाम नोंद करण्यात यावी अन्यथा बेमुदत उपोषणाचा इशारा

उंड्रीगाव संघर्ष समितीच्या वतिने पालिका उपायुक्त अजित देशमुख यांना निवेदन देताना ग्रामस्थ (छाया संदिप डोके हडपसर)

हडपसर प्रतिनिधी: संदीप डोके 

उंड्री (ता.हवेली) हे गाव सन २०१७ पर्यत ग्रामपंचायत हद्दीमध्ये होते मात्र २०१७ ला सदरील गाव हे पुणे महानगर पालिकेत समाविष्ट झाले परंतु पालिकेमध्ये समाविष्ट जाले तरी सदरील गावातील बांधकाम कर नोंदी अद्यापही पालिकेने संगणीकिय (पिडीएफ) मध्ये नोंदी केल्या नाही येत्या ८ दिवसात लवकरात लवकर संबंधित विभाने नोंदी न केल्यास उंड्री गाव संघर्ष समितीच्या वतिने उपोषन करण्यात येईल असा इशार संघर्ष समितीच्या वतिने जनसेवक राजेंन्द भिंताडे यांनी दिला आहे

उंड्रीगाव संघर्ष समितीने विविध मागण्यासाठी २०/१२/२०२२ ते २८/१२/२०२३ असे महानगरपालिकेच्या निषेध्दार्थ ८ दिवसांचे उपोषण उंड्री या ठिकाणी केले होते त्यानंतर पुणे महानगर पालिकेचे संबंधित विभागाचे अधिकारी लवकरात लवकर तुमची काम करु असे आश्वासन देऊन पत्र ही दिले उपोषण सोडविले मात्र ८ ते ९ महिन्यांचा कलावधी होऊन गेला तरी अद्याप कोणतेच काम संबंधित विभागाने केले नाही.

उंड्रीगावा मध्ये ज्या मिळकती आहे त्याचा मिळकत कर ग्रमपंचायत असताना सन २०१७ ते २०१८ पर्यत भरला आहे त्याच्या कर पावत्या देखील ग्रामस्थानकडे आहे मात्र सन २०१७ मध्ये उंड्रीगाव पालिकेत समाविष्ट झाल्यानंतर उंड्रीगाव ग्रामस्थानकडुन घेण्यात आला नाही तरी संबंधित विभागाने बांधकाम मिळकत कर संगणकीय मधील (पीडिएफ)नोंद करुन घावी उंड्री गाव ग्रामस्थानकडुन या मागणीचे निवेदन पालिका आयुक्त यांना उंड्रीगाव ग्रामस्थानच्या वतिने देण्यात आले या वेळी पुणे मनपा आयुक्त यांनी संबंधित विभागाच्या अधिकार्यांशी चर्चा करुन लवकरात लवकर उंड्रीगावचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले असल्याचे उंड्रीगाव संघर्ष समितीने सांगीतले .

जनसेवक राजेंद्र भितांडे म्हणाले कि उंड्री गाव पालिकेत गेल्यापासुन कोणत्याच नागरीसुविधा पालिकेला देता आल्या नाही पालिकेत गाव जाऊन देखील कोणताच फायदा नागरीकांना झाला नाही तर नुकसान झाले त्यात निवणुका होत नाही त्यामुळे लोकांना काम करुन घेणारा लोकप्रतिनी नाही पालिकेत प्रशासन त्यामुळे जनतेने न्याय मागायचा कोणाकडे? पालिका प्रशासन आश्वासनापलिकडे कोणतेच काम करत नसल्याने जनता त्रस्त आहे तरी संबंधित विभागाने आता याकडे लवकर लक्ष देऊन काम करु दिली नाही तर येत्या आठ दिवसात बेमुदत उपोषण करण्याचा इशारा जनसेवक राजेंन्द्र भिंताडे व उंड्री गाव गामस्थानच्या वतिने पालिका प्रशासनाला दिला आहे.

जनसेवक राजेंद्र भिंताडे सुभाष टकले उत्तम फुलावरे दादासो कड हनुमंत घुले अनिल कनाडे वंसत कड प्रविण अबनावे गणेश कानाडे मोहन भाडाळे ओंकार होले राजेंद्र होले अविनाश टकले विशाल कामठे सचिन पुणेकर सुभाष घुले यांनी पालिका आयुक्त यांना निवेदन देण्यात आले.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें