[कोंढवा सासवड येवलेवाडी रस्यात पडलेल्या खड्यात शिवसेना नेते संदिप धांडेकर व युवा कार्यकर्ते वृक्षारोपण करताना]
हडपसर प्रतिनिधी : वैभव संदिप डोके
ता.हवेली (दि.३) खडीमशिन चौकातुन सासवडकडे जाण्यासाठी जवळचा मार्ग म्हणुन कोंढवा सासवड येवलेवाडी रस्त्याचा वहान चालक वापर करतात मात्र हा रस्ता वाहन चालकांच्या दृष्टीने मृत्युचा सापळा बनला असुन रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ते असा प्रश्न वहानचालकांना पडला असुन लवकरात लवकर सदरील रस्त्याचे काम सबंधित विभागाने न केल्यास तिव्र आंदोलन करण्याचा इशाराउद्वव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना नेते संदिप(दादा) धांडेकर यांनी प्रशासनाला दिला आहे.
येवलेवाडी हे गेल्या १५ वर्षापासुन पुणे महानगरपालिकेत गेले आहे मात्र सर्व सामान्य जनतेला कोणत्याही मुलभुत सुविधा या भागात पालिका प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधी देऊ शकले नाही रस्ते, पाणी, ड्रेनेज,पावसाळी लाईन अशा कोणत्याच सुविधा पालिकेने अद्याप दिल्या नाहित त्यातच कोंढव्यावरुन येवलेवाडी सासवडच्या रस्त्याची पुर्णता चाळण झाली असुन भविष्यात या रस्त्यावर मोठा अपघात होण्याची पालिका प्रशासन वाट पहात आहे? या झोपलेल्या प्रशासनाला जाग येणार कधी ? पहिले आमचे गावास गामपंचायत होती तेव्हा गावचा विकास होत मात्र पालिकेत गेल्यावर साध्या नागरीकांना रोजच्या जीवनात लागणार्या गरजा देखील पालिका प्रशासन देऊ शकत नाही तर सर्व सामान्य नागरीकांनी कोणाकडे जायचे त्यात पालिकेने चार चा प्रभाग केल्याने वेगळ्या पक्षाचे नगरसेवक निवडुन आल्याने नेमकी कोणी काम करायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे.
त्यामुळे या भागाचा विकास न होता भकास झाला आहे येवलेवाडी कडे येणारा रस्ता तर जीव घेणाच झाला आहे त्यामुळे शाळेत गेलेली मुले तसेच कामावर गेलेला घरचा माणुस घरी येईपर्यत घरच्यांची धाकधुकी होत आहे असे ही शिवसेना नेते संदिप दादा धांडेकर यांनी सांगीतले कोंढवा येवलेवाडी सासवड रस्ता तर पुर्ण खड्यात गेल्याने रस्त्यात पडलेल्या खड्यात संदिप धांडेकर यांच्या नेतृत्वाखाली वृक्षारोपण करून संबंधित प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.
संबंधित प्रशासनाने लवकरात लवकर रस्ता निट करावा उगच नागरीकांच्या जीवाशी खेळु नये येत्या १५ आँगस्ट पर्यत संबंधित विभागाने रस्त्याचे काम मार्गी न लावल्यास उद्वव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतिने रस्ता रोको करण्याचा इशारा संदिप दादा धांडेकर यांनी दिला आहे यावेळी युवा कार्यकर्ते राम वाडकर,त्रृषी काळभोरअमुल मिस्रा उपस्थित होते.
[पालिका प्रशासन कोंढवा सासवड रस्त्यावरील खड्यात सिमेंट ब्लॉक टाकुन खड्डे बुजवितानाचा केविलवानी प्रयत्न करताना]
पालिकेचा दिशाभुल करण्याचा प्रयत्न
कोंढवा सासवड येवलेवाडी रस्त्यावर पालिकेच्या वतिने खड्यात सिमेंट ब्लॉक टाकुन खड्डा बुजविण्याचा केविल वानी प्रयत्न सुरु होता पण या प्रयत्नाने काय होणार का उगच पालिका प्रशासन ठेकेदारांचे पोट भरण्याचे काम करत आहेे नक्की काम जनतेसाठी की ठेकेदारांनसाठी असा प्रश्न येथील नागरीकांना पडला आहे.