आमच्या घरात आम्ही जायचे कसे? घरासमोरच पाण्याचे तळे:संतप्त नागरीकांचा सवाल उंड्री- भिंताडेनगर येथील परिस्थिती

उंड्री भिंताडेनगर येथे नागरीकांच्या घरासमोर निर्माण झालेले तळे (छाया:संदिप डोके हडपसर)

हडपसर दि २ (प्रतिनिधी) संदीप डोके 

 पुणे महानगर पालिकेत गाव जाऊन अनेक वर्ष होऊन देखील पालिका प्रशासनाला अद्यापही नागरीकांना नागरी सुविधा तसेच पावसाळी लाईन टाकता न आल्याने घरासमोरच पाण्याचे तळे निर्माण झाले आहे  

उंड्री -भिंताडेनगर येथे मुसळधार पावसामुळे पाण्याचे तळे झाले त्यामुळे आम्ही आमच्या घरात जायचे कसे असा संतप्त सवाल स्थानिक नागरीकांनी केला आहे आमच्याकडे लक्ष द्यायला कोणाला वेळ आहे कि नाही?

अचानक आलेल्या पावसाने परिसरात ठिकठिकाणी पाणी साठण्याचे प्रकार झाले आहे. उंड्री मधील भिंताडे नगर हिल ग्रीन स्कुल समोर सतत पडणाऱ्या पावसाने घरासमोर पाण्याचे तळे साठले.या भागात रस्त्यांना समतोलपणा नसल्याने आणि पाणी वाहून जाण्यासाठी पावसाळी वाहिनी नसल्याचा फटका नागरिकांना बसला.घरासमोर अगदी दारापर्यंत पाणी साठल्याने घरातून बाहेर पडणेच मुश्किल झाले आहे.नागरिकांचे दैनंदिन कामकाज विस्कळीत झाले.

विद्यार्थ्यांना शाळेत सोडणे सुद्धा रद्द करावे लागले महनगरपालिकेत गाव जाऊन ४वर्ष झाली मात्र पालिकेने याभागात कोणतीच ठोस कामे केली नाही त्यामुळे नागरीकांना अनेक अडचनींना सामोरे जावे लागत आहे प्रशासन एखादी मोठी जिवीत हानी झाल्यावर लक्ष देणार का भिंताडेनगर येथे हिल ग्रीन स्कुलच्या मुलांचा देखील आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यात दीड वर्षापासुन पालिकेत नगरसेवक नसुन पालिकेवर प्रशासन असल्याने नागरीकांनी प्रश्न मांडायचे कोणाकडे प्रश्न मांडले तर प्रशासन अधिकारी उडवा उडवीची उत्तर देतात त्यामुळे नागरीकांनी जायचे कोणाकडे असा प्रश्न नागरीकांना पडला आहे शासनाने लवकरात लवकर निवडणुका घ्याव्यात म्हणजे नागरीकांची काम मार्गी लागतील भिंताडेनगर भागातील कामे पालिकेने लवकरात लवकर मार्गी लावावीत असे स्थानीक रहिवाशी भाजपाचे युवा नेेेते जनसेवक राजेंद्र भिंताडे यांनी सांगितले.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें