पुण्यधाम आश्रम भिंताडेनगरकडे जाणार्या रस्त्यामधोमध धोकादायक विजेचे धोकादायक खांब
हडपसर दि.३१(प्रतिनिधी) संदीप डोके
कोंढवा बुद्रुक,सोमजी चौकातुन पुण्यधाम आश्रम -भिंताडेनगर कडे जाणार्या रस्त्यात धोकादायक विजेचे खांब असल्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे तरी संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष देऊन धोकादायक खांब काढण्याची मागणी जनसेवक राजेंन्द्र भिंताडे यांनी केली आहे
सोमजी चौक ते भिंताडेनगर जाणार्या रस्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे रस्त्यात खड्डा कि खड्यात रस्ता अशी परस्थिती निर्माण झाली असुन त्यात रस्त्याच्या मधोमध विजेचे खांब असल्याने अपघाताचा धोका संभवतो या भागात मोठ्या प्रमाणात इंग्लिश मिडीयम स्कुल असल्याने शाळा सुटल्या नंतर मोठ्या प्रमाणात वहातुक कोंडी होते त्यात अरुंद रस्त आणी विजेचे धोकादाय खांब रस्त्या मधोमध असल्याने वहान चालकांना चांगलीच कसरत करावी लागते त्यामुळे भविष्यात एखादा मोठा अपघात होण्याची प्रशासन वाट पहात आहे का?असा संतप्त सवाल जनसेवक राजेंन्द भिंताडे यांनी केला
बेशिस्त वहान चालकांन मुळे अपघाताच्या प्रमाणात देखील वाढ होत असल्याने शाळेतुन मुले घरी येईपर्यत पालकांच्या मनात भितीचे वातावरण असते तरी स्थानिक नगरसेवक व पालिका प्रशासनाने याकडे लवकरात लवकर लक्ष देऊन सदरील विजेच्या धोकादायक खांबांचा प्रश्न मार्गी लावावा. अशी मागणी जनतेकडून होत आहे