लोणीकंद ता . हवेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दिनांक २८ व २९ ऑगस्ट २०२३ रोजी “मनशक्ती प्रयोग केंद्र लोणावळा” यांचेमार्फत आयोजित माइंड जीम प्रेझेंटेशन व पालक संपर्क मेळावा असा आगळा वेगळा उपक्रम शाळेत घेतल्याची माहिती मुख्याध्यापक एकनाथ शिंदे यांनी दिली.
यामध्ये प्रामुख्याने उपस्थित सोमेश्वर महिला पतसंस्थेच्या चेअरमन पुजा प्रदीप कंद, लोणावळा येथील कार्यकारी विश्वस्त गोविंदभाई शिंदे ,प्रा.अजित फाफाळे ,सागर चंदने,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य, लोणीकंदचे सरपंच , उपसरपंच, ग्रा, सदस्य आजी-माजी पदाधिकारी सर्व शिक्षक वृंद त्याचबरोबर पालकही बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रथम सत्रात प्रास्ताविक पुजा प्रदीप कंद यांनी केले तर पालकांचे उद्बोधन प्रा.अजित फाफाळे यांनी केले.तर द्वितीय सत्रात सागर चंदने यांनी माइंड जीम प्रेझेंटेशन केले.
इयत्ता १ ली ते ७ वी च्या १००% विद्यार्थ्यांनी माइंड जीमचा आनंद घेतला त्यामध्ये विद्यार्थ्यांना अनोखा आनंद मिळाला तर जीममध्ये पालक व विद्यार्थी रममाण झाले.आगळ्या वेगळ्या उपक्रमाचा लाभ पालक व विद्यार्थ्यांना झाला. सकारात्मक प्रतिक्रिया देऊन पालक मुलांच्या बाबतीत आधिक जागरूक झाले. विद्यार्थ्यांच्या अध्ययनातील समस्या व उपाययोजना यावर अंतर्मुख होऊन विचार करावयास लावणारे अप्रतिम व्याख्यान झाले.
कार्यक्रमाच्या शेवटी मनशक्ती प्रयोग केंद्र लोणावळा येथील कार्यकारी विश्वस्त आदरणीय गोविंदभाई शिंदे यांच्या अनमोल विचारांनी उपस्थितांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणारे शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत लोणीकंद, सर्व शिक्षक वृंद,पालक या सर्वांचे धन्यवाद देऊन आभार मानले.