लोणीकंद ता.हवेली येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या देशाचा अभिमान “विक्रम चांद्रयान-3” यशस्वी लँडिंगनंतर जल्लोष करत एकत्र पाहण्याची संधी आज सायंकाळी आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांना मिळाला.
. गावातील विद्यार्थ्यांनी शाळेत येऊन आनंद घेतला तर बसने घरी गेलेल्या विद्यार्थ्यांनी मोबाईलवर हा आनंद घेतला. तसेच शाळेतील सर्व शिक्षकांनी सुध्दा जल्लोष करत आनंद घेतला. चांद्रयान चे चंद्रावर यशस्वी लँडिंग ही देशासाठी गौरवाची बाब ठरली. यासाठी अहोरात्र कष्ट घेतलेल्या शास्त्रज्ञांचे विद्यार्थ्यांनी घोषणा देत व टाळ्यांच्या कडकडात मनापासून अभिनंदन केले.