तुळापूर, ता. हवेली ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी नुकतीच अर्चना धनंजय पुजारी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. विद्यमान सुरेखा शिवले यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक घेण्यात आली यावेळी अर्चना धनंजय पुजारी यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने त्यांची उपसरपंच पदी निवड झाली.असल्याचे ग्रामसेवक गणेश वालकोळी यांनी जाहीर केले. निवडणुकीच्या अध्यक्षस्थानी विघमान सरपंच गुंफा इंगळे ह्या होत्या.
यावेळी माजी सरपंच गणेश पुजारी, माजी उपसरपंच राजाराम शिवले, पवन खैरे,नवनाथ शिवले माजी, माऊली शिवले, रुपेश शिवले माजी उपसरपंच सुवर्णा राऊत ग्रा.सदस्य वर्षा शिवले, जयश्री शिवले, चेअरमन राजाराम शिवले, अभीनाथ पुजारी, माजी सरपंच लोचन शिवले,आशा शिवले, वंदना शिवले मा.ग्रा.सदस्य संजय चव्हाण, सहजपूर चेअरमन विजय थोरात,आप्पासाहेब जगताप, पांडुरंग शिवले, शांताराम शिवले, हनुमंत शिवले, अनिल शिवले, योगेश रामकृष्ण शिवले, संपत शिवले तसेच ग्रामसेवक गणेश वालकोळी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी ग्रामस्थांच्या वतीने अर्चना धनंजय पुजारी यांचा शाल पुष्पहार घालून अभिनंदन करण्यात आले.तर गावात जलजीवनच्या माध्यमातून पिण्याचे शुद्ध पाणी,कचरा व्यवस्थापन, तसेच गावच्या वाड्यावस्त्यांवर चांगले व दर्जेदार रस्ते बांधण्यासाठी ग्रामपंचायतच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे नवनिर्वाचित उपसरपंच अर्चना धनंजय पुजारी यांनी बोलताना सांगितले.